Bank_banks-770x433

दोन दिवसात बँकांची कामे करून घ्या !

महाराष्ट्र

Bank_banks-770x433

येत्या गुरुवारपासून बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सलग चार दिवस सु्‌ट्ट्या असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे उद्या मंगळवार आणि बुधवारी या दोन दिवसांतच बँकेची कामे करुन घ्यावी लागणार आहेत. बँका बंद असल्यामुळे एटीएममध्येही रोख रकमेची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे कॅशची व्यवस्थाही आधीच करून ठेवा.
गुरुवारी २९ मार्चला महावीर जयंती, शुक्रवारी ३० मार्चला गुड फ्रायडे, शनिवारी ३१ मार्चला इअर एन्डिंग आणि १ एप्रिलला रविवार आहे. या सलग आलेल्या सुट्यांबाबत अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना सूचना दिल्या आहेत आणि महत्त्वाची कामे २८ तारखेपर्यंत आटोपून घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे बँकेतील कामे उरकून घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *