road-accident

road-accident

चाळीसगाव शहरापासून दक्षिणेला चार किमी अंतरावर असणा-या महामार्ग पोलीस चौकी समोरच ही घटना घडली. कर्तव्यावर असलेल्या ट्रॅफिक पोलिसाला ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चाळीसगाव जवळ कन्नड घाटात आज सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.अनिल शालिग्राम शिसोदे असं मृत पोलिसाचं नाव आहे. शिसोदे हे गेल्या तीन वर्षापासून चाळीसगाव वाहतूक शाखेत कार्यरत होते. सोमवारी ते महामार्ग पोलीस चौकीच्या समोर कर्तव्य बजावत असताना धुळे येथून औरंगाबादकडे जाणा-या ट्रकला त्यांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्यांना चिरडून ट्रकचालक फरार झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *