1

चिपको आंदोलनाच्या आठवणी गुगलने डूडलद्वारे जागविल्या

व्यापार

1

चिपको आंदोलनाला आज ४५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने गुगलने डूडलच्या माध्यमातून चिपको आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्‍ह्यात १९७० च्या दशकात झालेल्या या आंदोलनाला आज, सोमवारी ४५ वर्षे पूर्ण झाली. महिलांनी अहिंसक पद्धतीने केलेल्या या आंदोलनाच्या आठवणीत गुगलने खास डूडल बनवले आहे.
संपूर्ण भारतामध्ये जंगलतोड रोखण्यासाठी व वनसंपत्तीच्या संवर्धनासाठी गांधीवादी मार्गाने अहिंसक चळवळ करण्यात आली. या आंदोलनाला सुरुवात १९७३ मध्ये तत्‍कालिन उत्तर प्रदेशमधील चमोली जिल्‍ह्यातून झाली. अलकनंदा खोर्‍यातील मंडल गावच्या लोकांनी या आंदोलनास सुरुवात केली. वन विभागाच्या ठेकेदारांनी जंगलातील झाडे तोडण्यास सुरुवात केली होती. तेव्‍हा चिपको आंदोलनाचा जन्‍म झाला.
आंदोलनात महिला अग्रभागी होत्या. आंदोलनाच्या प्रणेता गौरा देवी होत्या. त्यांना ‘चिपको वुमन’ या नावानेही ओळखले जाते. झाडे तोडायला आल्यास आंदोलक अहिंसक पद्धतीने झाडाला मिठी मारत आणि झाड तोडण्यापासून परावृत करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *