vodafone

तरुणांसाठी व्होडाफोनची ‘आंतरराष्ट्रीय भविष्य नोकरी कार्यक्रमा’ची घोषणा

व्यापार

vodafone

वोडाफोनने बुधवारी जगातील सर्वात मोठ्या ‘आंतरराष्ट्रीय भविष्य नोकरी कार्यक्रमा’ची घोषणा केली. या कार्यक्रमात वोडाफोनतर्फे २०२२ पर्यंत भारतात ५० लाख आणि १८ देशातील १ कोटी तरुणांना नव्या जगातील नव्या नोकऱ्या करण्यासाठी तयार केले जाणार आहे.
तरुणांसाठी ही एक उत्तम संधी ठरणार असून डिजिटल अर्थव्यवस्थेत चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. तरुण पात्रतेनुसार तसेच आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपली ओळख तयार करु शकणार आहेत. याद्वारे ऑनलाइन डिजिटल कौशल्य प्रशिक्षण शोधणेही सोपे होणार आहे. व्होडाफोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील सूद याबाबत म्हणाले, भारतात सर्वाधिक तरुण आहेत. डिजिटल कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशाप्रकारचे उपक्रम आवश्यक आहेत. येत्या काळात व्होडाफोनव्दारे तरुणांना उत्तमोत्तम संधी देऊन आम्ही आमच्या परिने प्रयत्न करणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *