279449-214829-kw-srishti1

धक्कादायक ! बाल्कनीतून पडून ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

देश

279449-214829-kw-srishti1

गाजियाबाद येथील राजनगर एक्सटेंशनच्या केडब्ल्यू सृष्टी सोसायटीत बुधवारी २१ मार्चला धक्कादायक घटना घडली. सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर खेळत असताना खाली पडून एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
रविंद्र आपल्या कुटंबासमेवत सृष्टी सोसायटीतील ई-ब्लॉकमध्ये पाचव्या मजल्यावर राहत होता. त्याचा पाच वर्षांचा मुलगा रुद्रांश किचनच्या बॉल्कनीमध्ये खेळत होता. ही घटना घडली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य घरातच होते. मात्र त्यांना घटनेचा मागमूसही लागला नाही. घटना घडल्यानंतर ५ मिनिटांनी सोसायटीतील सदस्यांनी त्यांच्या परिवाराला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर या कुटुंबाला जाग आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुद्रांश बॉल्कनीतील सायकलवर चढून खाली वाकून पाहात होता. त्याचदरम्यान तो दुसऱ्या मजल्यावरील छतावर पडला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *