5ab2497466e0f_saroj-khan-and-n-chandra-the-director-of-tezaab-to-take-a-legal-action-against-baaghi-2-for-vandalizing-ek-do-teen

‘एक दो तीन’च्या रिमेकवर ‘तेजाब’चे दिग्दर्शक एन. चंद्रा नाराज

मनोरंजन

5ab2497466e0f_saroj-khan-and-n-chandra-the-director-of-tezaab-to-take-a-legal-action-against-baaghi-2-for-vandalizing-ek-do-teen

‘तेजाब’चे दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी ‘एक दो तीन’ या रिक्रिएटेड गाण्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. मूळ गाणे कोरिओग्राफर करणा-या कोरिओग्राफर सरोज खान यांनीही या गाण्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. बऱ्याच जुन्या गाण्यांचे रिमेक नव्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र, जुनं तेच सोनं असं अनेकांचंच मत आहे. याला कारण म्हणजे, ‘बागी २’ या आगामी चित्रपटातील ‘एक दो तीन’ हे गाणं. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ चित्रपटातील या गाण्याचं रिमेक करण्यात आलं असून जॅकलीन फर्नांडिस रिमेकमध्ये थिरकताना पाहायला मिळत आहे. मात्र, हा रिमेक पाहून अनेकांनीच नाराजी व्यक्त केली असून आता ‘तेजाब’चे दिग्दर्शक एन. चंद्रा हेसुद्धा रिमेकवर भडकले आहे.
‘तेजाब’ चित्रपटातील ‘एक दो तीन’ या गाण्यातील माधुरी दीक्षितच्या अदा आणि तिच्या नृत्यकौशल्याची सुरेख झलक पाहायला मिळाली होती. सरोज खान यांनी त्या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं होतं. रिमेकमधील जॅकलीनचे नृत्य आणि अदा पाहून सरोज खान यांनाही धक्का बसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *