279488-214929-python

अजगराचा खेळ गारुडीच्या जीवावर

देश

279488-214929-python

अजगराचा खेळ दाखवताना एका गारुड्याला महागात पडला.त्याने अचानक गारुड्याचा गळा आवळला आणि बघता-बघता गारुडी जमिनीवर कोसळला. उत्तर प्रदेशातील मऊ जनपदच्या मुहम्मदाबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली.
लोकांना जिवंत प्राण्याचा – अजगराचा तमाशा दाखवता दाखवता एका गारुड्याला अजगरानं पकडलं… लोकांना वाटलं की हा गारुडी खेळच करतोय… तो संकटात आहे, याची जाणीवच न झाल्यानं ते केवळ या घटनेचा व्हिडिओ काढत राहिले.
गारुड्यानं अजगराला आपल्या गळ्याला गुंडाळलं होतं… आणि अजगरानं आपली वेटोळ्यातली पकड मजबूत केली… त्याचा गारुड्याच्या गळ्याला पीळ बसला. खूप प्रयत्न केला तरी त्याला अजगराचा पीळ सोडवता येईना. हा प्रकार घडला तेव्हा अनेकांना हा खेळातलाच एक भाग आहे असं वाटलं, त्यामुळे तिथे उपस्थितांनी हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यातही शूट केला.
अजगराने पुन्हा त्याच्या गळ्याला वेढा घालण्याचा प्रयत्न केला असता, गर्दीमधील एका व्यक्तीला गारुडी बेशुद्ध तर पडला नाही ना अशी शंका आली. त्याने पाणी आणून गारुड्यावर शिंपडलं, तरीही त्याला शुद्ध आली नाही. त्याची शुद्ध हरपल्याचं लक्षात येताच, गर्दीमधील काहींनी त्याला प्रथमोचार केंद्रात दाखल केलं.
गारुड्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला उपचारांसाठी वाराणसीमध्ये पाठवलं.
दरम्यान, या गारुड्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *