fadnavis-kTII--621x414@LiveMint

अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला मेस्मा अखेर रद्द -मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई

fadnavis-kTII--621x414@LiveMint

अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला ‘मेस्मा’ कायदा स्थगित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भात निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा कायदा स्थगित करण्याची घोषणा केली.
राज्यातील अंगणवाडी सेविकांना गेली अनेक वर्षे पाच हजार रुपये व मदतनीसांना साडेतीन हजार रुपये मानधन देण्यात येत होते. गेल्या वर्षी दोन लाख अंगणवाडी सेविकांनी २६ दिवस संप पुकारल्यानंतर सरकारने त्यांच्या मानधनात १५०० रुपये वाढ केली . त्याचप्रमाणे १ एप्रिल २०१८ पासून पाच टक्के मानधनवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *