food-in-vibrant-gujrat_20141215_134213_15_12_2014

भारतीय रेल्वेची ‘नो बिल, फ्री फूड पॉलिसी’ लॉन्च

देश

food-in-vibrant-gujrat_20141215_134213_15_12_2014

भारतीय रेल्वेने आता ‘नो बिल, फ्री फूड पॉलिसी’ लॉन्च केली आहे. म्हणजेच, तुम्ही रेल्वेचा वापर करून प्रवास करत असाल आणि या प्रवासादरम्यान तुम्ही रेल्वेकडून जेवण मागवले पण त्याचे बिल तुम्हाला दिले गेले नाही तर तुम्ही बिलच भरू नका, असे निर्देशच रेल्वेमंत्र्यांनी दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.
रेल्वेमध्ये अनेकदा जेवण ऑर्डर केल्यानंतर त्याचं बिल दिलं जात नाही… इतकंच नाही तर प्रवाशांकडून अनेकदा अधिक किंमत वसूल केली जाते. हे व्यवहार बंद व्हावेत यासाठी रेल्वेप्रशासनानं हे पाऊल उचललं आहे.
कोणत्याही प्रवाशानं आता प्रवासादरम्यान जेवण ऑर्डर केल्यास वेंडरला बिलाची मागणी करावी… एखाद्या वेंडरनं बिल देण्यास नकार दिला तर प्रवाशांनी जेवणाचे पैसे देऊ नये, असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे.
ज्या ट्रेन्समध्ये प्रवाशांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलीय त्या सर्व ट्रेनमध्ये या नव्या पॉलिसीची नोटीस ३१ मार्चपासून लावण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *