xya-rog

राज्यभरातील खासगी औषधविक्रीच्या दुकानांमध्ये क्षयरोगाची औषधे मोफत

मुंबई

xya-rog

क्षयरोगाचे जे रुग्ण सरकारी आरोग्य केंद्रावर न येता खासगी डॉक्टरांकडे उपचार घेत असतील, अशा रुग्णांनाही मोफत औषधे मिळावीत यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.राज्यभरातील खासगी औषधविक्रीच्या दुकानांमध्ये क्षयरोगाची औषधे मोफत मिळणार असून मुंबईमध्ये सध्या सुमारे १५० औषध विक्रेत्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यभरात दरवर्षी क्षयरोगामुळे मृत पावणाऱ्या रुग्णांपैकी १८ टक्के रुग्ण हे मुंबईमध्ये आहेत, मागील तीन वर्षांमध्ये ३.७७ लाख क्षयरोगाचे रुग्ण राज्यभरात आढळले असून यापैकी ७१,३६८ रुग्ण हे मुंबईमध्ये आढळून आले आहेत.
देशभरात झपाटय़ाने फोफावत चालेल्या क्षयरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने २०२५ पर्यत ‘क्षयरोगमुक्त भारत’ निर्माण करण्याची मोहीम हाती घेतली असून यासाठी राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून राज्यभरामध्ये औषध विक्रीच्या दुकानांमध्ये क्षयरोगाची औषधे मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी सरकारने अन्न व औषध प्रशासनाला १४ फेब्रुवारी रोजी पत्राद्वारे कळविले होते. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनानेही या योजनेला मंजुरी दिली असून राज्यभरातील परवानाधारक औषध विक्रीच्या दुकानांमध्ये क्षयरोगाची औषधे मोफत देण्यास परवानगी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *