1sanjya_nahar

नगरच्या कुरिअर कार्यालयातील स्फोटक पार्सल पुण्यातील सरहद या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख यांच्या नावे

महाराष्ट्र

1sanjya_nahar

माळेवाडा परिसरातील मारुती कुरियर येथे झालेल्या स्फोटातील पार्सल सरहद्द संघटनेचे अध्यक्ष संजय नहार यांच्या नावाने हे पुण्याला पाठविले जात होते, अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे.हे पार्सल पुण्यातील सरहद या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख संजय नहार यांच्या नावे असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे नहार यांच्या घातपातासाठी हे पार्सल पाठवण्यात आले होते का? याचा संशय बळावला आहे. हे पार्सल नगरमधून पुण्यात पाठवण्यात येणार होते. नगर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पोलिस पथक चौकशीसाठी पुण्याला रवाना झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अहमदनगरमधील माळीवाड्यातील मारुती कुरिअर कंपनीच्या कार्यालयात मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या पार्सलचा स्फोट झाला होता. यावेळी कार्यालयात तीन जण काम करीत होते. या स्फोटात संदीप भुजबळ आणि संजय क्षीरसागर हे जखमी झाले होते. दोघांवर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, याच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी घाबरुन घराबाहेर धाव घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *