Afghanisyan-2

Afghanisyan-2

अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे आज (दि.२१) झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान २५ जण ठार तर सुमारे १८ जण जखमी झाले. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.हा हल्ला राजधानी़तील एका शिया धार्मिक स्थळावर करण्यात आला. हल्लेखोर घटनास्थळी चालत आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली जात आहे.
राजधानीत लोक पारसी वर्षांची सुट्टी एन्जॉय करत असतानाच हा दहशतवादी आत्मघातकी हल्ला करण्यात आला. स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तींना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *