279279-214572-aamir-mukesh11

आमिरखानच्या ड्रीम प्रोजेक्टला अंबानींची साथ ?

मनोरंजन

279279-214572-aamir-mukesh11

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आखानमिर ‘महाभारत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना ‘लार्जन दॅन लाइफ’ अनुभव देण्याचा आमिरचा प्रयत्न आहे आणि या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी तो सध्या दिवसरात्र मेहनत घेत आहे. अर्थातच या चित्रपटाचा खर्चदेखील तितकाच जास्त असणार आहे. मुकेश अंबानी या चित्रपटाचा खर्च उचलणार असल्याचे म्हटले जात आहे.
सीरिजमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याचे तीन ते चार भाग असल्याचे म्हटले जात आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक भागासाठी दिग्दर्शकसुद्धा वेगवेगळे असतील. ‘महाभारता’ची निर्मिती करणे हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, असे आमिरने याआधी एका मुलाखतीत सांगितले होते.
या फिल्म सीरीजसाठी १००० कोटींहुन अधिकचे बजेट असेल. या जबरदस्त बजेटसह हा भारतीय सिनेमांमधील सर्वात मोठा सिनेमा असल्याचे बोलले जात आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *