647359-anna-hazare-1

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा सरकारविरोधात पुन्हा एल्गार

देश

647359-anna-hazare-1

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २३ मार्चपासून जंतरमंतरवर आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, त्रेचाळीस वेळा पत्र पाठवूनही दखल घेण्यात आलेली नाही. परदेश दौऱ्यात व्यस्त असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नसल्याची टीका, यावेळी अण्णा यांनी केली.परंतु दिल्लीतील आंदोलन होणारच असल्याचे त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आपण लोकांसाठी आंदोलन करत आहे. हार्ट ॲटॅक येऊन मरण्यापेक्षा देशासाठी मरणं चांगलं, म्हणून उपोषण करणारच, असा निर्धार अण्णा हजारे यांनी केलाय. लोकपालची अंमलबजावणी आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा यासाठी आंदोलन हे आंदोलन आहे, असे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान,यावेळी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांकडून राजकारणात जाणार नाही, अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र लिहून घेणार आहोत, असे अण्णा यांनी स्पष्ट केले. याआधीची टीम अण्णा फुटली किंवा ती फोडण्यात आली. ती फुटली नसती तर देशाचं चित्र खूप सुंदर राहिलं असंतं. टीम अण्णा फुटल्यामुळं देशाचं नुकसान झालं, अशी खंत हजार यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *