Battery-on-Fire_1511271548140

धक्कादायक ! चार्जिंग करताना मोबाईलचा स्फोट, तरुणीचा मृत्यू

देश

Battery-on-Fire_1511271548140

ओडिशामध्ये मोबाईल चार्जिंग करताना स्फोट झाल्याने १८ वर्षाच्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. चार्जिंग सुरु असताना मोबाईलवर बोलण्याचा अथवा व्हॉट्सअप, किंवा अन्य व्हिडीओ न पाहण्याचा सल्ला वारंवार दिला जातो. तरीही अनेक मोबाईलवेडे व्यक्ती या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना एक क्षणही मोबाईलपासून विरह सहन होत नाही. मोबाईल वापराच्या या व्यसनामुळेच ओडिशामध्ये एका तरुणीला जीव गमावावा लागला आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार झारसुगुडा जिल्ह्यातल्या खेरियाकानी गावामध्ये ही घटना घडली आहे. उमा उराव असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या तरुणीचे नाव आहे.
मोबईल चार्जिंगला लावला असतानाही उमाचे फोनवर संभाषण सुरु होते. त्याचवेळी अचानक मोबाईलचा स्फोट झाला. या स्फोटानंतर संपूर्ण खोलीमध्ये आगीचे लोळ पसरले होते. या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या उमाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *