596525-sushma-swaraj

इराकमध्ये अपहरण झालेल्या ३९ भारतीयांचा मृत्यू – सुषमा स्वराज

देश

596525-sushma-swaraj

इराकमध्ये अपहरण झालेल्या ३९ भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली. चार वर्षांपुर्वी मोसुलमधून या भारतीयांचं अपहरण झालं होतं. या भारतीयांमध्ये मजुरांची संख्या जास्त होती. यामधील अनेकजण पंजाबमधील होते. आयसीसने २०१४ मध्ये मोसुलचा ताबा घेतल्यानंतर या सर्व भारतीयांचं अपहरण करुन ओलीस ठेवलं होतं. भारतीय मोसुलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच आयसीसने त्यांचं अपहरण केलं होतं.
२०१४ मध्ये इराकमधील मोसूल भागातून जून महिन्यात आयसिस या दहशतवादी संघटनेने ४० भारतीयांचं अपहरण केलं होतं. या ४० जणांपैकी एकटा हरजीत मसीहची सुखरुप सुटका झाली होती. मात्र या ३९ भारतीयांबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नव्हती. त्यावेळी परराष्ट्रमंत्र्यांनी भारतीयांना इराकमधील कारागृहात बंद केलं असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमधील ३१ जण पंजाब, चौघे हिमाचल आणि बाकीचे बिहारमधील आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *