ajay-1

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने घेतले कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन

मनोरंजन

ajay-1

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने आज सहकुटुंब कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. अजय देवगण पत्नी काजोल आणि आईसह अंबाबाईच्या दर्शनाला आला. सोशल मीडियावर सध्या त्याच्या कोल्हापूर भेटीचे फोटो व्हायरल झाले आहेत. पारंपरिक वेशात यावेळी अजय आणि काजोलने अंबाबाईचं दर्शन घेतलं. त्यासोबतच अंबाबाईची ओटीसुद्धा भरली.
अजय, त्याची आई आणि काजोल हे तिघंही मंगळवरी सकाळी खासगी विमानाने कोल्हापूरला रवाना झाले होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अंबाबाईच्या मंदिरात जाऊन देवीला अभिषेक घालत तिचं दर्शनही घेतलं. यावेळी मंदिर परिसरात कोल्हापूरकर, चाहत्यांनी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. काजोल आणि अजयला पाहण्यासाठी आलेल्या गर्दीला आवरण्यासाठी पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *