DYoW8rMX4AUl8wk

‘रेस 3 ‘चं पहिलं पोस्टर रिलीज

मनोरंजन

DYoW8rMX4AUl8wk

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या बहुप्रतिक्षीत ‘रेस 3 ‘ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सलमानने स्वत: हे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. दरम्यान, दिग्दर्शक रेमो डिसूजाचा ‘रेस 3’ यंदा ईदला प्रदर्शित होणार आहे. सलमानशिवाय चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, बॉबी देओल, अनिल कपूर, डेझी शाह आणि साकिब सलीम हे कलाकारही दिसणार आहेत.
“या आठवड्यात ‘रेस 3’ च्या कुटुंबाची ओळख करुन देतो….माझं नाव आहे सिकंदर. सेल्फलेस ओव्हर सेल्फीश,” असं ट्वीट सलमान खानने केलं आहे. या संपूर्ण आठवड्यात सिनेमाशी संबंधित इतर कलाकारांचेही पोस्टर समोर येतील, असं या ट्वीटमुळे दिसत आहे.
सध्या अबुधाबीमध्ये सलमान ‘रेस 3’चे शूटिंग करत आहे. त्याने या चित्रपटासाठी एक रोमँटिक गाणेही लिहिल्याचे म्हटले जात आहे. हे गाणे सलमानने ऐकवल्यानंतर सगळ्यांना आवडले. या गाण्याला विशाल मिश्राने संगीत दिले असल्यामुळे क्रेडिट लिस्टमध्ये सलमानचे नाव गीतकार लिहिले जाण्याची ही पहिली वेळ असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *