1488139984-6075

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, महाराष्ट्र २०१९ पर्यत मोतीबिंदू मुक्त करणार

राजकीय

1488139984-6075

राज्यात मोतीबिंदूच्या आजाराने पिडीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या राज्यात साडेसतरा लाख मोतीबिंदू रुग्ण आहेत. त्यामुळे सर्व रुग्णावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येऊन येत्या जुलै २०१९ पर्यत सर्व रुग्णांची तपासणी करून त्यांच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी शासन उचलून महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासनासोबतच खासगी क्षेत्रातील १७५ रुग्णालयात रोज किमान १० तास मोतीबिंदू शस्त्रक्रिया होत आहेत. आतापर्यंत ५० हजार शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सन २०५० पर्यंत देशात ११ कोटी लोक नेत्ररोगाने ग्रस्त होतील. महाराष्ट्र शासनाने यासाठी सक्रिय पुढाकार घेतला आहे. त्यामुळे माधव नेत्रालयाचीही शासनाला मदत होईल. नागपूर शहर हे मेडिकल हब म्हणून पुढे येत आहे. माधव नेत्रालयामुळे यात मोलाची भर पडली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *