जनतेशी संवाद हीच आपली स्फूर्ती असल्याचे सातत्याने सांगणारे महाराष्ट्र स्वाभिमान संघटनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार निलेश राणे हे आता वेबसाईटच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात येणार असून या अधिकृत वेबसाईटचे लॉन्चिंग उद्या शनिवारी त्यांच्या वाढदिनी त्यांच्या हस्ते मुंबई येथे होणार आहे. www.nileshnrane.in असे या वेबसाईटचे नाव आहे.
अखंड उर्जेचा स्त्रोत असलेले माजी खासदार निलेश राणे यांचा जनतेशी संपर्क आणि संवाद या महत्त्वाच्या बाबी आहेत. थेट आपली भूमिका मांडणा-या निलेश राणे यांचा राज्यभरात दांडगा जनसंपर्क असून युवकांची संख्या त्यात अधिक आहे. त्यातच समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्याची त्यांची तळमळ असते. मात्र वेळेअभावी प्रत्येकाशी थेट संपर्क साधणे अशक्य असते. अशावेळी सध्याच्या वेगवान तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेच्या, युवकांच्या अधिकाधिक संपर्कात येण्यासाठी निलेश राणे यांच्या www.nileshnrane.in या अधिकृत वेबसाईटचे लॉन्चिंग उद्या मुंबई येथील त्यांच्या कार्यालयात त्यांच्या हस्ते होणार आहे.
या वेवसाईटच्या सुरूवातीलाच महाराष्टचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा असून ‘महाराष्टची जनता हेच आमचे भांडवल आणि त्यांचे प्रेम हीच आमची ताकद’ हे पक्षाचे ब्रीदवाक्य आहे. त्याशिवाय श्री. राणे यांचे लेटेस्ट अपडेटस्, ब्लॉग्ज यासह त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेली विविध आंदोलने, समाजोपयोगी कार्यक्रम, राजकीय भाषणे,त्यांच्या उपस्थितीत पार पडलेले विविध कार्यक्रम,निलेश राणे यांची मुलाखत,सभेतील भाषणे अपलोड केलेली आहेत. त्याशिवाय ज्या नागरिकांना श्री. राणे यांच्याशी थेट संपर्क साधावयाचा आहे,समस्या मांडायच्या आहेत त्यांच्यासाठी ‘लाईव्ह चॅट’सुध्दा उपलब्ध असणार असून स्वत: निलेश राणे या लाईव्ह चॅटद्वारे जनतेशी संपर्क करणार आहेत. सध्या निलेश राणे हे NileshNarayanRane या फेसबूक आणि @NileshNRane या ट्विटर हॅन्डलद्वारे जनतेच्या संपर्कात असून येथेही त्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत. हा संपर्क अधिकाधिक वाढविण्यासाठी ही वेबसाईट तयार करण्यात आली असून मुंबई येथील कार्यालयात उद्या त्यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून निलेश राणे वेबसाईटचे लॉन्चिंग करणार आहेत.
ही वेबसाईट श्री. राणे यांचे कार्यकर्ते आणि एसएनपी सॉफ्टवेअरचे मुख्य प्रवर्तक नितीन पाटील यांच्या संकल्पनेतुन ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे.