plastic_20171018217

राज्यात अखेर प्लास्टिक बंदी

महाराष्ट्र

plastic_20171018217

राज्यात रविवारी गुढीपाडव्यापासून प्लास्टिक पिशव्या, थर्माकोलच्या ताट, वाटय़ा, चमचे, पेले, कप याबरोबरच जाहिरातींचे फ्लेक्स, बॅनर्स, तोरण यांच्या निर्मिती आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाल्याचे समजते.
प्लास्टिक नैसगिक आणि जैविकदृष्ट्या विघटनशील नसतो. प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या इतर उत्पादनांच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. प्लास्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू होत असल्याने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागातर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे प्लास्टिक विक्री करणाऱ्या आणि वापरणाऱ्या अशा दोघांवरही दंडात्मक कारवाईची तरतूद असेल.
या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना २५ हजारांचा दंड आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. प्लास्टिक बाटल्यांचा मात्र या बंदीत समावेश झालेला नाही. तसेच दुधासारख्या पदार्थाच्या प्लास्टिक पिशव्यांचा या बंदीत समावेश नसल्याचे समजते.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *