rape_1_1689557_835x547-m

हरयाणातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर राज्य एका बलात्काराच्या घटनेने हादरले

देश

rape_1_1689557_835x547-m

हरयाणातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना हे राज्य आणखी एका बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. दहावीच्या विद्यार्थिनीला परीक्षेत मदत करण्याच्या मोबदल्यात एका मुख्याध्यापकाने तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. परीक्षेला डमी परीक्षार्थी पाठवत मुख्याध्यापकाने पीडित मुलीला शाळेलगतच्या घरात नेत तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी मुख्याध्यापक आणि अन्य दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोहाना येथील शाळेत शिकणारी पीडित विद्यार्थीनीची दहावीची परीक्षा सध्या सुरू आहे. मात्र गणित विषय तिला कठिण जात असल्याने तिच्या वडिलांनी मुख्यध्यापकांकडे तिला पास करण्याची विनंती केली होती. त्यावेळी मुख्यध्यापकांनी पीडित मुलीच्या जागी डमी विद्यार्थीनी बसवण्याचा पर्याय त्यांना दिला होता. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून दहा हजार रुपये देण्याची मागणी केली होती.
पीडित मुलीचे वडील देखील डमी विद्यार्थीनी बसवायला तयार होते. मात्र मुख्यध्यापकांनी त्या पीडित मुलीला परीक्षा संपेपर्यंत शाळेजवळच्या घरात लपण्यास सांगितले. परीक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळाने शाळेचे मुख्याध्यापक तेथे आले व त्यांनी दोन महिलांच्या मदतीने त्या मुलीवर बलात्कार केला. तसेच याबाबत कुणालाही काही सांगितल्यास दहावीच्या परीक्षेत नापास करण्याची धमकी देखील दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *