00-whatsapp-tips-lead_stuff

आता व्हाट्सअॅप ग्रुपमध्येच सदस्याला पर्सनल मेसेज पाठवू शकता

व्यापार

00-whatsapp-tips-lead_stuff

मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप युजर्ससाठी एक नवीन अपडेट आणत आहे. या अपडेटमुळे ग्रुप मधील सदस्याला पर्सनल मेसेज पाठवणे शक्य होणार आहे. त्यासाठी तुम्हाला त्या सदस्याला वेगळा पर्सनल मेसेज पाठवण्याची गरज नाही. तुम्ही ग्रुपमध्येच तुम्ही सदस्याला पर्सनल मेसेज पाठवू शकता.
व्हाट्सअॅपच्या नवीन बीटा व्हर्जनमध्ये आलेल्या नवीन बदलामुळे ग्रुपचा सदस्य त्या पर्सनल मेसेजला उत्तरही देऊ शकेल. पूर्वी तुम्ही केलेला मेसेज ग्रुपमधील सर्व सदस्य वाचू शकत होते. त्यामुळे पर्सनल मेसेज करण्यासाठी ग्रुप बाहेर पडून पर्सनल चॅटवर जावून तुम्हाला मेसेज करावा लागत होता.मात्र या नवीन अपडेटमुळे तुमचा हा त्रास वाचणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *