DXWIMjVVAAANLNw

राज्यात दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता

महाराष्ट्र

DXWIMjVVAAANLNw

दक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे उद्या १५ व १६ मार्च रोजी राज्यातील कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण आणि तापमानात घट होणार आहे. यामुळे या दोन दिवसात हलक्‍या पावसाच्या सरी कोसळण्यार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

दोन दिवसांत गारपीट अथवा वादळाची शक्‍यता नसून शेतकऱ्यांनी कापणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेऊ नये, असे आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे. या काळात बाजारात विक्रीसाठी आणलेल्या मालाची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. ढगाळ वातावरण आणि हलक्‍या सरींमुळे गहू आणि आंबा मोहोर यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. मुंबईसह कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी आवश्‍यक त्या उपाययोजना करुन शेतमालाचे नुकसान टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *