India's players  celebrate the dismissal of Bangladesh's Soumya Sarkar with his team mates during their second Twenty20 cricket match in Nidahas triangular series in Colombo, Sri Lanka, Wednesday, March 14, 2018. (AP Photo/Eranga Jayawardena)

भारताचा निदहास चषक तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश

क्रीडा

India's players  celebrate the dismissal of Bangladesh's Soumya Sarkar with his team mates during their second Twenty20 cricket match in Nidahas triangular series in Colombo, Sri Lanka, Wednesday, March 14, 2018. (AP Photo/Eranga Jayawardena)

भारताने निदहास चषक तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रोहित शर्माच्या टीम इंडियानं बांगलादेशचा १७ धावांनी पराभव करून कोलंबोतल्या तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. या विजयाचा शिल्पकार फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर हा ठरला.

या सामन्यात भारतानं बांगलादेशला विजयासाठी १७७ धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला वीस षटकांत १५९ धावांतच रोखलं. भारताकडून ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरने सर्वात प्रभावी मारा केला. त्यानं २२ धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं.
फलंदाजीत रोहित शर्माने केलेल्या ८९ धावांच्या खेळीला सामन्याच्या अखेरीस सामनावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं. त्यामुळे श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यात कोण बाजी मारतं आणि अंतिम फेरीत भारताची गाठ कोणासोबत पडते याकडे सर्व क्रीडा रसिकांचं लक्ष लागलेलं असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *