tangkap-ilustrasi-1-131215b

बांधकाम व्यावसायिकाकडे २० कोटीची खंडणी मागणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याला अटक

महाराष्ट्र

tangkap-ilustrasi-1-131215b

मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याला अटक करण्यात आली. . गुलाब पारखे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पुणे जिल्हा परिषदेचा सदस्य आहे.
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचे पवईत कार्यालय आहे. गुलाब पारखे हा पूर्वी २७ वर्षे संबंधित बिल्डरकडे एजंट म्हणून कामकाज पाहत होता. मागील वर्षी त्याने नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने सरकारी कार्यालयातून संबंधित व्यक्तीची आरटीआय कायद्याअंतगर्त माहिती मागवून घेतली आणि ही माहिती उघड न करण्यासाठी त्याच्याकडे २० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाही तर सगळी माहिती उघड करून त्याला अडचणीत आणण्याची धमकीसुद्धा दिली होती.
गुरुवारी सकाळी बिल्डरच्या कार्यालयातून एका कर्मचाऱ्याने पवई पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तसेच खंडणीची मागणी करणारे ऑडिओ रेकॉर्डिंगही पोलिसांना पुरावा म्हणून दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी सापळा रचून मुलुंड येथील एका हॉटेलमधून गुलाब पारखेला अटक केली. २० कोटींपैकी २ कोटी रुपये स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *