6337efa6d3aa5375f7462c1deead1e54

केईएम रुग्णालय दुसऱ्या मजल्यावरील छताचा भाग कोसळला

मुंबई

6337efa6d3aa5375f7462c1deead1e54

परळमधील प्रसिद्ध केईएम रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील डायलिसीस विभागातील छताचा भाग बुधवारी रात्री कोसळला. या दुर्घटनेत दोन रुग्णांसह चार जण जखमी झाले आहेत. रात्री तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून छताचे प्लास्टर व एसीचे सिलिंग पडले आहेत.छताच्या दुरुस्तीसाठी तीन ते चार दिवस लागतील, अशी माहिती हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे.
दररोज केईएम रुग्णालयात शेकडो रुग्ण डायलिसीस करण्यासाठी दुरवरून येत असतात. अशा रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून हा विभाग तात्काळ दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आला आहे. मात्र या दुर्घटनेमुळे केईएम रुग्णालयातील रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *