devendra-fadnavis-650_650x400_71488628785

एमपीएससी भरतीत वाढ करण्याबाबत सरकार प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र

devendra-fadnavis-650_650x400_71488628785

राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून भरण्यात येणाऱ्या जागांचा आढावा घेऊन त्यात वाढ करण्याबाबत सरकार प्रयत्नशील असून मोठय़ा प्रमाणात जागा निघतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यातील विद्यार्थ्यांना दिली. एमपीएससी भरतीसाठी सध्या सुरू असलेली काही आंदोलने खासगी क्लासेसने पुरस्कृत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून एमपीएससी परीक्षेसाठी राज्यातील लाखो विद्यार्थी बसत असताना भरतीच होत नसल्याने त्यांच्या भवितव्याबाबत प्रश्‍न विधानसभेत उपस्थित केला होता. ते म्हणाले, सध्याच्या सरकारच्या काळात आंदोलन केल्याशिवाय न्यायच मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कालच्या आदिवासी आणि शेतकरी आंदोलन पहाता पुन्हा एकदा हेच स्पष्ट झाले. एमपीएससीच्या पदांची भरतीच होत नसल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *