aadhar-card

सुप्रीम कोर्टाचा सर्वसामान्यांना दिलासा, आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ

देश

aadhar-card

तुमचे आधार कार्ड बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि पॅन कार्डला लिंक केले नसेल तर ही बातमी तुम्हाला दिलासा देणारी आहे. सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड लिंक करण्याची मुदत अनिश्चित काळासाठी वाढवली आहे. आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवण्यासंदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी आधारकार्ड लिंक करण्याची मुदत पुढील सुनावणी होईपर्यंत वाढवण्याचे आदेश दिले.
मोबाईल नंबर, बँक अकाऊंट आणि इतर सर्व सार्वजनिक सेवांसाठी आधार लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा मुदतवाढ देत सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला.
पॅन कार्ड आणि बँक अकाऊंटसोबतच मोबाईल नंबर, शेअर स्टॉक्स, क्रेडिट कार्ड, एलपीजी कनेक्शन, इंश्योरन्स, पीपीएफ, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र, म्युच्युअल फंड आणि इतर सुविधांसाठी आधार लिंक करणं अनिवार्य करण्यात आलं होतं. त्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *