Armory

शस्त्रास्त्रांची आयात करणाऱ्या देशांच्या यादीत भारत अव्वलस्थानी

देश

Armory

भारताला शस्त्रास्त्रांसाठी अजूनही दुसऱ्यांवर देशांवर अवलंबून राहावे लागत आहे.परदेशी शस्त्रे आणि संरक्षणासाठी लागणारे उपकरणे आयात करणारा भारत पहिला देश बनला आहे. २०१३ ते २०१७ या कालावधीत शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणाऱ्या देशांच्या यादीत भारत अव्वलस्थानी आहे. जगातील शस्त्रास्त्रांच्या एकूण आयातीपैकी १२ टक्के आयात एकटा भारत करतो.
भारत जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र खरेदीदार देश असून भारतातील ६२ टक्के शस्त्रास्त्रे हे रशियाकडून येतात. तर अमेरिकेकडून १५ टक्के आणि इस्रायलकडून ११ टक्के शस्त्रास्त्रांची खरेदी करण्यात आली आहे. रशिया आणि इस्रायलकडून भारत नेहमीच शस्त्रास्त्रांची खरेदी करत आला असला तरी अमेरिकेकडून निर्यातीचे प्रमाणही वाढले आहे.
‘इंटरनॅशनल आर्म्स ट्रान्सफर्स’ने नुकताच एक अहवाल सादर केला. या अहवालानुसार, भारताकडून शस्त्रे आयात करण्याच्या टक्केवारीत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २००८ ते २०१३ च्या तुलनेत भारतानं २०१३ ते २०१७ पर्यंत २४ टक्के अधिक शस्त्रे आयात केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *