Girish-Bapat-photos

राज्यात दूध भेसळ करणाऱ्यांना शिक्षा

महाराष्ट्र

Girish-Bapat-photos

राज्यात दूध भेसळ करणाऱ्यांना शिक्षा करणारा कायदा लवकरच करणार असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केली आहे. आता दूध भेसळ प्रकरणातील दोषींना तीन वर्षांचा कारावास होणार आहे.
दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी अनेक आमदारांनी विधानसभेत केली होती. मात्र जन्मठेपेची शिक्षा करणारा कायदा आणण्यात अडचणी असल्याचं बापट यांनी यावेळी सांगितलं.
दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी अनेक आमदारांनी विधानसभेत केली. मात्र, जन्मठेपेची शिक्षा करणारा कायदा आणण्यात अडचणी असल्याचं बापट यांनी यावेळी सांगितले.
सध्या दूध भेसळीची तपासणी करण्यासाठी राज्यात चार मोबाईल व्हॅन आहेत. मात्र, ज्या सातत्याने या व्हॅनद्वारे तपासणी व्हायला हवी, ती होत नसल्याबद्दल कबुली देताना संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत समज देण्यात येईल, असे सांगत यापुढे तपासण्यांमध्ये अधिक सातत्य असेल अशी ग्वाही बापट यांनी विधानसभेत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *