12_03_2018-mahindra-kuv100-trip

महिंद्राची KUV100 Trip कार लाँच

व्यापार

12_03_2018-mahindra-kuv100-trip

महिंद्रा आणि महिंद्राने आपली लोकप्रिय नवं व्हर्जन KUV100 Trip कार लाँच केली आहे. मध्यमवर्ग आणि व्यावसायिकांना लक्षात घेऊन, या कारची रचना करण्यात आली आहे.महत्त्वाचं म्हणजे ही कार प्रेट्रोल आणि सीएनजी दोन्हीतही उपलब्ध आहे. याशिवाय डिझेल इंजिनचा पर्यायही आहे.KUV100 Trip च्या सीएनजी मॉडेलची किंमत 5.16 लाख रुपये आहे, तर डिझेल कारची किंमत 5.42 लाख रुपये आहे.KUV100 Trip पहिल्यांदाच सीएनजीच्या पर्यायासह तयार करण्यात आली आहे. ही गाडी दोन रंगात उपलब्ध आहे. डायमंड व्हाईट आणि डॅझलिंग सिल्ह्वर या दोन रंगात ही गाडी मिळेल.महिंद्राच्या KUV100 Trip या कारला मारुती इग्निसचं आव्हान असेल. या गाडीचं सुरुवातीची शोरुम किंमत 4.59 लाख रुपये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *