1

पुण्यात जादूटोण्याच्या अघोऱ्या प्रथेने घेतला महिलेचा जीव

महाराष्ट्र

1

पुण्यात जादूटोण्याच्या अघोऱ्या प्रथेने एका महिलेचा जीव घेतला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सच्या उपस्थितीत आजारी महिलेवर मांत्रिकाच्या मदतीने उपचार केल्‍याची घटना समोर आली आहे. योग्यवेळी योग्य उपचार न मिळाल्यामुळे या महिलेला आपला जीव गमवाला लागला. संध्या गणेश सोनवणे असे मृत महिलेचे नाव आहे. ती अवघ्या २४ वर्षांची होती.
छातीत गाठ झाल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या या महिलेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. संध्या सोनवणे असं या महिलेचं नाव आहे. या महिलेला आधी स्वारगेट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तब्येत खालावल्याने त्यांना दीनानाथमध्ये हलवण्यात आले आणि आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्यावर जादुटोणा करण्यासाठी मांत्रिकाला पाचारण करण्यात आल्याचा आरोप तिच्या भावानंच केला आहे. डॉक्टर सतीश चव्हाण यांनी या मांत्रिकाला आणल्याचं व नजर उतरवण्यासाठी उतारा काढल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, बहिणीची तब्येत महत्त्वाची असल्यानं आपण त्याबाबत काही बोललो नाही असं या महिलेच्या भावानं पत्रकारांना सांगितलं. यासंदर्भातला हा व्हिडीयोही व्हायरल झाला असून त्यामध्ये एक व्यक्ती हातात फुल घेऊन ती त्या महिलेच्या अंगावरून उतारा केल्यासारखी फिरवताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *