big_346931_1417447545

छत्तीसगड सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ला, ८ जवान शहीद

देश

big_346931_1417447545

छत्तीगसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे ८ जवान शहीद झाले आहेत. तर ६ जवान जखमी झाले आहेत.
सुकमा जिल्ह्यातील किस्तराम परिसरातून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २१२ व्या बटालयनचे जवान जात होते. यादरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडीद्वारे स्फोट घडवला. या स्फोटात आठ जवान घटनास्थळीच शहीद झाले. तर सहा जवान गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
छत्तीसगडमधील हा आठवडाभरातील दुसरा नक्षलवादी हल्ला आहे. यापूर्वी ७ मार्चला नक्षलवाद्यांनी कांकेर जिल्ह्यात आयईईडी स्फोट घडवला होता. त्यामध्ये दोन जवान शहीद झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *