fire

तामिळनाडूत जंगलाला लागलेल्या वणव्यात विद्यार्थी अडकले

Uncategorized

fire

तामिळनाडूतील थेनी जिल्ह्य़ातील कुरंगनी हिल्स येथील जंगलात लागलेल्या वणव्यात रविवारी ३६ विद्यार्थी अडकले. थेनी जिल्ह्यातील कुरंगनी येथील जंगलात कोईमतूर आणि इरोडे येथून सुमारे ३६ विद्यार्थी गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना जंगलात अचानक लागलेल्या आगीमुळे हे विद्यार्थी अडकून पडले. स्थानिक आदिवासी, पोलीस आणि बचाव पथकांच्या मदतीने त्यांना वाचवण्यात यश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ट्रेकिंग ग्रुपने वन विभागाकडून परवानगी न घेतल्यामुळे वनाधिकाऱ्यांना याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. यामध्ये पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर काही जण बेपत्ता आहेत.
आतापर्यंत २८ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली असून त्यातील १० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्थानिकांच्या मदतीने बचाव पथकं अडकलेल्या गिर्यारोहकांना वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *