Protest

विविध मागण्यांसाठी किसान सभेचा मोर्चा आझाद मैदानात दाखल

महाराष्ट्र

Protest

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला हजारो शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाला.
शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा, कृषिपंपाचे वीजबिल माफ करा, स्वामीनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबईत ३० हजार शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला आहे. मुंबईकर आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हे शेतकरी रात्रभर पायपीट करत सोमय्या मैदानातून आझाद मैदानात पोहोचले. एकीकडे मोर्चा काढताना सर्वसामान्यांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती वाढत असताना शेतकऱ्यांमधील या माणुसकीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
नाशिकहून निघालेला हजारो शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च रविवारी मुंबईत दाखल झाला. रविवारी रात्री मोर्चेकरी विद्याविहारजवळील सोमय्या मैदानात विश्रांती करुन सोमवारी सकाळी सहा वाजता विधान भवनाच्या दिशेने मार्गस्थ होणार होते. मात्र दहावी- बारावीच्या परीक्षा आणि मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी रविवारी रात्रीच आझाद मैदान गाठण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *