patangrao-kadam-600x310

जाणत्या राजास मानाचा मुजरा

अग्रलेख

patangrao-kadam-600x310

हो. हो आमचे दैवत. डाॅ.पतंगरावजी कदम साहेब
शिक्षण, शेती, सहकार, समाजकारण, राजकारण यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे, महाराष्ट्र काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक, पलुस-कडेगावंच्या जनतेचा कल्पवृक्ष. महाराष्ट्राचे माजी मंत्री, सर्वसामान्यातील असामान्य कर्तृत्ववान व्यक्तीमत्व सन्माननीय आमदार डॉ.पतंगरावजी कदम साहेब…….
कृष्णा काठी, सह्याद्रीच्या कुशीत, सोनहिरा खोऱ्यामध्ये एक अकल्पित विकासाचे पडलेलं स्वप्न…….
विकास म्हणजे काय याच अखंड देशातील एक मुर्तीमंत उदाहरण……
डाॅ.पतंगरावजी कदम साहेब एक वादळ, एक झंझावात………
भारती विद्यापीठ. हाॅस्पिटल .बॅक. बझार .साखर कारखाने. सुतगिरणी.अशा अनेक संस्था आदर्श आणि पारदर्शक चालविणारा कर्तबगार …..
हजारो लोकांचे संसार उभे करणारा लाखांचा पोशिंदा …….
पलुस_कडेगाव तालुक्यातील जनतेचा आधारवड ………
दुरदृष्टी असणारे नेते..उत्कृष्ट स्मरण शक्ती, अफाट बुद्धी चातुर्य व उत्साही ,दिलखुलास नेते….
अतिशय आत्मविश्वासाने जनतेसाठी आयुष्यभर काम करणारे दिलदार …..
कोणत्या कामासाठी कोठून निधी आणायचा याच ज्ञान असणारा नेता …..
समाजकारण आणि राजकारण यामध्ये नेहमी रोखठोक भुमिका घेणारा रांगडा माणूस……
ध्यास फक्त आकाशी भरारी घेण्याचा पण गरीबीची , गरीबांची, दिनदुबळ्यांची जान ठेवणारा लोकनायक…….
छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची हिंमत असणारा ….
दानत म्हणजे काय असते हि पहावी (कर्णानंतर )असा महानायक…….
आदर्श बंधूप्रेम ,कुटुंब वत्सलता..आम्ही ह्याची देही ह्याची डोळा पाहीली असा बंधू…………
ते नेहमी म्हणत
संघर्ष माझ्या पाचविला पुजला आहे त्यामुळे मी कधिच संघर्षाला घाबरत नाही……..
भान ठेवून योजना आखतो आणि बेभान होऊन त्या राबवितो ……..
हजार आरोप माझ्यावर करा पण भारती विद्यापीठावर एक टिका हि मी सहन करणार नाही ……
तसेच; मतदारसंघातील लोकांना दुष्काळात हि पिकविम्याचे पैसे वअतीवृष्टि मध्ये हि पिकविम्याचे पैसे मिळवून देणारे……..
हजारो एकर जमीन ओलिताखाली आणणारे .शेतकऱ्यांनी कधीही पाण्यासाठी व त्यांच्या मुलभुत प्रश्नासाठी आंदोलन केले नाही; त्याचे आम्ही साक्षीदार…….
हजारो मुले दत्तक घेऊन उच्च शिक्षित केली .मोफत शिक्षण घेऊन हजारो डाॅक्टर, इंजिनिअर,वकील झाली……….
वयाच्या १९व्या वर्षी भारती विद्यापीठ स्थापन केले .त्यामध्ये आज विसहजार पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. तसेच …ST महामंडळामध्ये चालक वाहक म्हणून हजारो नोकरी दिल्या …….
पण ते नेहमी म्हणतात मी उभ्या आयुष्यात नोकरीसाठी कोणाकडून एक रूपयां अथवा चहातही मिंधा नाही…….
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणसे ओळखण्याची कला आणि माणसं जोडण्याचा छंद ह्या दैवी गुणांनी त्यांना दैवत्व बहाल केले ……
अशा महामानवास ,जाणत्या राजास मानाचा मुजरा…….
भावपूर्ण श्रध्दांजली??
पलूस-कडेगाव मतदार संघाचे भाग्यविधाते मा.आमदार डॉ.पतंगरावजी कदम साहेब यांच्या आत्म्यास शांती लाभो.

के.डी.जाधव सर (सातारा)     

 

 

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *