f0b86d4cefc457978f42ef7b6535ecae

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आम्ही समाधानी नाही – लवाटे दाम्पत्य

मुंबई

f0b86d4cefc457978f42ef7b6535ecae

अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या इच्छामरणाच्या नाजूक मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं आज एक ऐतिहासिक निकाल दिला. सन्मानाने जगण्याच्या घटनादत्त अधिकाराकडे लक्ष वेधून, घटनापीठाने इच्छामरणाला सशर्त मंजुरीच दिली आहे. अर्थात, या निर्णयाचा दुरुपयोग किंवा गैरवापर होऊ नये यादृष्टीने स्पष्ट नियमावली तयार करण्याचे निर्देश सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी दिले. मात्र सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे आम्ही समाधानी नाही अशी प्रतिक्रिया मुंबईतील लवाटे दाम्पत्याने दिली आहे.
आम्ही दोघेही धडधाकट आहोत. आम्ही अवयव दान केल्याने जितक्या लवकर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी मिळेल तितके ते आमच्यासाठी फायद्याचे ठरेल. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्हाला पटला नाही असे लवाटे दाम्पत्याने म्हटले आहे. ३१ मार्च पर्यंत आम्ही सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे अजून तरी आम्ही काही निर्णय घेतलेला नाही असे इरावती लवाटे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *