277133-211283-vasundhara-raje1

राजस्थान सरकारचा निर्णय, बलात्कार करणाऱ्यास फाशी

देश

277133-211283-vasundhara-raje1

बारा वर्षांच्या खालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्याचा कायदा आज शुक्रवारी राजस्थान विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे. मध्य प्रदेशनंतर असा कायदा करणारं राजस्थान हे दुसरं राज्य ठरलं आहे. राजस्थानमधील मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे सरकारने बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा असणारे कायदा बिल मंजूर केले. हे बिल आता राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
राजस्थानात इंडियन पीनल कोडमध्ये ३७६ – एए या कलमाची भर टाकण्यात आली आहे. त्यात स्पष्ट केले आहे की, बारा वर्षांपर्यंतच्या मुलीवर बलात्कार केल्यास त्या गुन्हेगाराला मृत्यूदंडाची किंवा किमान १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात येईल. तुरुंगवासाची शिक्षा, जन्मठेपेपर्यंत म्हणजे व्यक्ती नैसर्गिकरीत्या मरण पावेपर्यंत वाढवता येईल. शिवाय आरोपीला दंडही ठोठावता येईल.
याचप्रकारे सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यासाठी ३७६ – डीडी या कलमाचीही भर टाकण्यात येणार आहे. या विधेयकामागची कारण मीमांसा करताना राज्य सरकारने नमूद केले की “सगळीकडे बालकांवर बलात्कार व सामूहिक बलात्कार करण्याचे प्रमाण वाढत आहे. याला आळा बसला पाहिजे. असे घृणास्पद प्रकार होता कामा नये म्हणून हा कायदा करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *