698a738200fb3c1c78874f1f74027335

सीरियात रशियाच्या प्रवासी विमानाचा अपघात,32 जणांचा मृत्यू

विदेश

698a738200fb3c1c78874f1f74027335

रशियाच्या एका प्रवासी विमानाचा मंगळवारी सीरियाच्या विमानतळावर लँड होत असताना अपघात झाला. या अपघातात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या संरक्षण विभागाने ही माहिती दिली. सीरियाच्या खमीमिन विमानतळावर विमान लँड होत असताना हा अपघात झाला. या विमानात 26 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर होते. विशेष म्हणजे, या विमानतळाला यापूर्वीच एअर स्ट्राईक म्हणून घोषित करण्यात आले आहे. हा अपघात विमानात तांत्रिक अडचणींमुळे झाल्याचा अंदाज रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *