mumbai-fire

मुंबई काळाचौकी परिसरात गोदामाला भीषण आग

मुंबई

mumbai-fire

मुंबईतील काळाचौकी परिसरातील गोदामात मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. गोदामालगतचा परिसर रिकामा करण्यात आला असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
काळाचौकीतील दत्ताराम लाड मार्गावर हे गोदाम आहे. या गोदामाला सकाळी भीषण आग लागली. या घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे १६ फायर इंजिन्स आणि पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परिसरात धुराचे लोण पसरले आहे. घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. इस्टर्न मेटल कंपनीचे हे गोदाम आहे. या एकमजली गोदामात आग लागली असून आग नेमकी कशामुळे लागली हे अजून अस्पष्ट आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *