murder_amethi_ge_040117

धक्कादायक ! कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलीची हत्या

महाराष्ट्र

murder_amethi_ge_040117

पतीनं पत्नी आणि मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना शिर्डीतील कोपरगावमधील खडकी भागात घडली आहे.या घटनेनंतर संशयित आरोपी पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. कौटुंबिक वादातून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गणेश भीमराव खरात असे संशयिताचे नाव असून तो कोपरगावला गवंडी काम करतो. त्याची सासू पत्नी गौरी आणि नातीला माहेरी घेऊन जाण्यासाठी बुलडाण्याहून आली असताना हा प्रकार घडला. गावाला जाण्यासाठी गौरीने गणेशकडे पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिला. मुलीला पैसे न दिल्याने सासूचे गणेशशी कडाक्याचे भांडण झाले. आई आणि नवऱ्यामधील भांडण सोडवण्यासाठी गौरी पुढे आल्यावर संतापलेल्या गणेशने शेजारी पडलेली कुऱ्हाड तिच्या डोक्यात घातली. पत्नीला मारल्यावर त्यांच्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर कुऱ्हाडीने वार करत तिलाही संपवले. त्यानंतर सासूवरही त्याने हल्ला केला, परंतु या हल्ल्यात सासूचे प्राण वाचले. मात्र पत्नीचा आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. या कृत्यानंतर गणेश हा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *