garpit

राज्यात काही भागात पुन्हा गारपीटचे सावट

महाराष्ट्र

garpit

राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा गारपीट होण्याची शक्यता आहे. येत्या बुधवारी मध्य महाराष्ट्रात तर गुरुवारी विदर्भातही गारपीट होण्याची शक्यता केंद्रीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
रविवारी राज्यभरातील हवा कोरडी होती. पुढील दोन दिवसही हवेमध्ये फारसा फरक पडणार नाही. मात्र उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने तसेच समुद्रावरून बाष्पयुक्त वारेही येण्याची शक्यता असल्याने बुधवारी मध्य प्रदेश तसेच नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर अशा राज्याच्या उत्तर भागात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. गुरुवारी मध्य महाराष्ट्रासोबतच विदर्भातही गारपीट होण्याची शक्यता आहे.
काही आठवडय़ांपूर्वी विदर्भ आणि मराठवाडय़ात गारपिटीमुळे उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झालेच, शिवाय काही शेतकऱ्यांचा बळी गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *