501098-mumbailocal

हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्वपदावर

मुंबई

501098-mumbailocal

वडाळा आणि कॉटनग्रीन स्थानकादरम्यान असलेल्या शिवडी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हार्बर रेल्वेवरील अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.जवळपास तीन तासांच्या खोळंब्यानंतर हार्बर मार्गावरील लोकल रेल्वेची वाहतूक सुरु झाली आहे. शिवडी स्थानकाजवळ तुटलेलं ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्यात आल्यानंतर वडाळा ते सीएसएमटी लोकल सेवा सुरु करण्यात आली. मात्र लोकल सध्या उशिराने धावत आहेत.
हा प्रकार आज (गुरूवार) सकाळी सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान घडला. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *