7945-temprature

मुंबईसह कोकणात तापमान वाढण्याची शक्यता – हवामान खाते

मुंबई

7945-temprature

दोन दिवस मुंबईतील तापमान वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.  मुंबईसह रायगड व रत्नागिरी या भागातहि  तापमानात वाढ होण्याची शक्यता  हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या मुंबईसह कोकण, सौराष्ट्र या भागातील तापमान वाढणार आहे. मुंबईत दिवसा तापमान ३८ अंश से. पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मुंबईतील सामान्य तापमानापेक्षा हे प्रमाण ६ अंश से. ने जास्त असल्याचे सांगितले जाते. बुधवारी आणि गुरुवारी तापमानात वाढ होणार असली तरी शुक्रवारी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी तापमानात काही प्रमाणात घट होईल. शुक्रवारी तापमान ३५ अंश से.पर्यंत राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारीत मुंबईत इतके तापमान आजपर्यंत कधीच नव्हते. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *