52e7051fb49b322e3cbf67c8243138c7

नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रात ६ नव्या केंद्रांना मान्यता

महाराष्ट्र

52e7051fb49b322e3cbf67c8243138c7

आतापर्यंत देशातील १०७ सेंटर्सवर नीटची परीक्षा घेतली जात असे.यामध्ये महाराष्ट्रातील सहा नव्या केंद्रांचा समावेश आहे.यामध्ये मुंबई उपनगर, बीड, बुलडाणा, जळगाव, लातूर आणि सोलापूरचा समावेश आहे.मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यांसदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली. नीट २०१८ परीक्षा रविवारी ६ मे रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. नीटसाठी राज्यात आतापर्यंत मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती, सातारा आणि कोल्हापूर ही दहा केंद्रे होती. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण केंद्रांची संख्या आता १६ वर पोहचली आहे.

नीटच्या नोंदणीसाठी आवश्यक माहिती

परीक्षार्थींना त्यांचा आधार कार्ड क्रमांक देणं बंधनकारक आहे. जर आधार कार्डमधील माहितीत साधर्म्य आढळलं नाही, तर विद्यार्थ्यांना नीट परीक्षेसाठीचा फॉर्म भरता येणार नाही.

नीटची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.cbseneet.nic.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरता येईल.१४०० रुपये प्रवेश शुल्क (एससी, एसटी उमेदवारांसाठी ७५० रुपये) आकारण्यात येईल. डेबिट/क्रेडीट कार्ड, यूपीआय किंवा नेटबँकिंगद्वारे हे पेमेंट करता येईल.

उमेदवार १७ ते २५ वर्ष वयोगटातील असावा. एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा 30 वर्ष आहे. बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थीही नीटसाठी नोंदणी करु शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *