dc-Cover-bbkji0p8r8vcngiud6ibau1n41-20160601031030.Medi

धक्कादायक ! नवरदेवाचा डोक्याला गोळी लागून मृत्यू

देश

dc-Cover-bbkji0p8r8vcngiud6ibau1n41-20160601031030.Medi

दिल्लीतील सीमापुरी परिसरातील कलंदर कॉलनीत मंगळवारी रात्री मोठ्या जल्लोषात लग्नाची वरात निघाली होती. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पण अचानक झालेल्या गोळीबारामुळे घोडीवर स्वार असलेला नवरदेव खाली पडला.
मृत नवरदेवाचे नाव दीपक (वय २३) असून तो आनंद विहार येथील बस स्थानकावर काम करतो. मंगळवारी रात्री उशिरा त्याच्या घरापासून वरात निघाली होती. फरिदाबाद येथे त्यांना जायचे होते. नवरदेव घोडीवर बसला होता. काही पावले पुढे गेल्यानंतर गोळी लागल्याने तो खाली पडला. डोक्याला मुंडावळया बांधल्यामुळे लोकांना काहीवेळ काहीच समजले नाही. मुंडावळया उतरवल्यानंतर गोळी लागल्याचे सर्वांच्या लक्षात आले. नातेवाईकांनी लगेचच त्याला रूग्णालयात दाखल केले. पण रात्री दोनच्या सुमारास उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
सुरूवातीच्या तपासानुसार वरातीत सहभागी झालेला युवक हवेत गोळीबार करत होता. त्याची एक गोळी नवरदेवाला लागली. आरोपीचा शोध घेतला जात आहे, असे पोलीस उपायुक्त नुपूर प्रसाद यांनी सांगितले. आरोपी हा मृत नवरदेवाचा नातेवाईक आहे. घरातून वरात निघाल्यापासून तो हवेत गोळीबार करत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *