sridevi-0116255001519649709

अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव आज मुंबईत आणणार

देश

sridevi-0116255001519649709

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्याच्या प्रक्रियेला वेग आला असल्याचे दिसून येते आहे. दुबई पोलिसांनी काही वेळापूर्वीच श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात घेऊन जाण्यासंबधीचे पत्र भारतीय दुतावास आणि श्रीदेवी यांच्या कुटुंबीयांना दिले आहे.गेल्या ५५ तासापासून श्रीदेवीचं पार्थिव दुबईमध्ये शवागारात ठेवण्यात आलं आहे. सरकारी वकिलांच्या परवानगीनंतरच श्रीदेवीचं पार्थिव मुंबईला आणता येणार आहे. तेव्हा आज रात्रीपर्यंत श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कायदेशीर पद्धतींमुळे श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत आणण्यास विलंब होत होता. अखेर पुढील काही तासांत त्यांचे पार्थिव मुंबईत येणार असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *