8aMRTIxb

आता बनणार लहान मुलांसाठी बाल आधार कार्ड, UIDAI ची माहिती

देश

8aMRTIxb

सरकारी सेवेचा लाभ घेण्यासाठी ओळखीचा दाखला म्हणून केंद्र सरकारनं आधारला मान्यता दिली आहे.लहान मुलांसाठी बाल आधार कार्ड जारी करण्यात येणार असल्याची माहिती यूआयडीएआयनं ट्विटरव्दारे दिली आहे. हे बाल आधार कार्ड निळ्या रंगाचं असणार आहे. पाच वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांचे आधार बनवताना आई किंवा वडील या दोघांपैकी एकाचा आधार नंबर तसेच मुलाच्या जन्माचा दाखला आवश्यक आहे.पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकाचे आधार बनवण्यासाठी बायोमॅट्रिक तपशीलाची गरज भासणार नसल्याचंही ‘यूआयडीएआय’ने स्पष्ट केले आहे. कोणत्याही आधार केंद्रावर नवजात बालकापासून पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे आधार मोफत बनवण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *