weather-1458899092_835x547

राज्यभरात सर्वत्र तापमानात वाढ

महाराष्ट्र

weather-1458899092_835x547

बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव ओसरल्याने राज्यभरात सर्वत्र कमाल तापमानात वाढ झाली आहे. राजधानी मुंबईत पाऱ्याने तब्बल ३७.६ अंश से.ची पातळी गाठली. पुढील दोन दिवस तापमान वाढलेले राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.उत्तरेकडील व समुद्राच्या बाजूने येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव वाढून शनिवारी-रविवारी राज्याच्या उत्तर भागात गारा पडतील आणि तापमानात घट होईल, अशी शक्यता आठवडय़ाच्या सुरुवातीला वेधशाळेकडून वर्तवण्यात आली होती. मात्र या दोन्ही बाजूंचे वारे तितकेसे प्रभावी ठरलेले नाही. बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव नसल्याने आणि जमिनीवरून वाहणाऱ्या कोरडय़ा तप्त वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने राज्यभरातील हवा तापली आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी दोन दिवसांपासून तापमान ३५ अंश से.वर जात आहे. अकोला येथील तापमान ३७ अंश से. वर गेले. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील कमाल तापमानात गेले दोन दिवस वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *